*माझ्या मऱ्हाठीचा जागर* 


             हल्ली लोक वाचत नाही असा काहीसा सुर काढला जातो. एक प्रयोग म्हणून मी 6000 लोकांना सध्या आपण काय वाचताय या विषयी लिहले. मी सध्या *रिच डॅड पुवर डॅड* हे पुस्तक वाचून पुर्ण केल्याने त्याचा उल्लेख केला होता. प्रतिक्रीयामध्ये जेव्हा 2500 पेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, तेव्हा असं वाटलं की, लोक वाचतायेत. नुसतं वाचत नाहीत तर, भरभरुन वाचतायेत. विशेष म्हणजे मराठी साहित्यावर खुप भर आहे. आज जागतिक मराठी दिनानिमित्त सर्वेक्षणाचा उहापोह करणे प्रस्तुत वाटते. वाचणाऱ्यांमध्ये सर्व स्तरातील लोक आहेत. याचे विशेष कवतीक वाटते ते म्हणजे तरुण पिढी वाचते आहे याचे. तसेच जी पुस्तकं वाचली जातात त्यात ऐतिहासीक, चरित्रात्मक, यशस्वीतेचा मंत्र देणारी अशी अनेक पुस्तके वाचतो आहोत. असे रिप्लाय मिळाले.
      त्यात स्वामी, मृत्युंजय, श्रीमानयोगी, छावा, आईनस्टाईन, माझी जन्मठेप, एडवीना ते नेहरु, नेपोलियन, अग्निपंख, हिंदु एक जगण्याची अडगळ, बुध्द आणि त्याचा  धम्म, समग्र फुले, बाबूराव अर्नाळकरांच्या कथा, काजळमाया ' पार्टनर, श्री, ती व तो, अमृतवेल, ययाती, रियासत इतपासून ते मी यशस्वी होणारच, माझा मी, विशाखा, १८५७ चा उठाव, उचल्या, उपरा, बये दार उघड, सिंदबादच्या सफरी, टारझन, आगळ अशी अनेक अनेक अनेक पुस्तकांची जंत्री माझ्याकडे आली आणि विश्वास बसला की, *तरुण पिढी मराठी वाचनाकडे वळली आहे*. विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांबद्दल वाचण्याचे प्रमाण वाढले आहे.
      काहींनी तर नेटवर पुस्तके वाचतो असे सांगितले. तर काहींनी धार्मीक वाचन करतो असे सांगितले. काहींनी विद्रोही साहित्य वाचल्याचे सांगितले. काहींनी न वाचल्याचे पण सांगितले पण ते प्रमाण नगण्य होते. जागतिक मराठी दिनानिमीत्त केवळ ०१ दिवस मराठी दिन साजरा करुन चालणार नाही तर आवर्जुन मराठीत बोलणे, मराठीत लिखाण करणे, हे सर्व केलेच पाहिजे.
मराठी संवर्धनए का दिवसाच्या चर्चेने नक्कीच होणार नाही,
पण चर्चा होते आहे हेही नसे थोडके.
कदाचित बेगडी प्रेम वाटेल. पण गेला बाजार तेही हवेच की . प्रमाण भाषा व बोली भाषा यावरून श्रेष्ठत्वाचे भांडणही मांडले जाईल, मराठी भाषेत नव्याने किती शब्द आले ते कुठल्याही भाषेतून येवो ते महत्त्वाचे नाही
कारण मराठीच मुळी संस्कृत प्रच्युत भाषा त्यात  कैक फार्सी, अरेबिक ,उर्दू, पर्सीयन ,इंग्रजी पोर्तुगीज, डच, असे परदेसी तर कानडी, गुजराथी , हिंदी, तेलगू, तामिळ, बंगाली अगदि पुश्तु सुद्धा असे परप्रांतीय भाषामधुन शब्द आले   तर अनेक साहित्यीकांनी , नव्याने शब्द भांडार वाढवला जसे सचिवालय, महापौर , झपूर्झा हे तर उत्कृष्ट सोदाहरण ठरावे तात्याराव व तात्यासाहेबांचे आभार मानावे तेव्हढं थोडेच,
   ग्रामीण ढंगाचे व बाजाच्या शब्दांचे सामर्थ वाढविले पाहिजे
आगळ, येठाण, धुऱ्या ,,, ,,,,,,,,,,, . हे शब्दच लुप्त होतील ,
      चला मराठीचे कवतिक करू या शुभ मराठी दिन ,,,,,
*चला तर मराठीचा जागर करुया*


*ज्ञानसूत*
*डॉ. संजय चाकणे*
27 फेब्रु,2020

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट