करके तो देखो

*करके तो देखो*


           आज आय कॉलेज इंदापूर मध्ये करके तो देखो ही संकल्पना राबवण्यात आली. नऊ वर्षांपूर्वी मी जेव्हा इंदापूर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो, त्यावेळी प्रा. भरत भुजबळ यांनी खेळासाठी काहीतरी करू या? अशी एक संकल्पना मांडली. आणि करके तो देखोचा जन्म झाला. म्हणता म्हणता या संकल्पनेचा एक वटवृक्ष होताना आम्ही पाहतो आहोत. करके तो देखो ही मूळ महात्मा गांधीजींचे संकल्पना.  महात्मा जी  'मिठाचा सत्याग्रह करा!' असे सांगत होते.  मोतीलाल नेहरूंनी मात्र या संकल्पनेला विरोध केला होता. शेवटी गांधीजींनी त्यांना एक पत्र लिहिलं, त्यांनी फक्त एवढंच लिहिलं  'करके तो देखो' शेवटी तो आदेश होता. मोतीलाल नेहरू दिल्लीच्या चांदणी चौकात एक भाषण के. हे भाषण अर्थातच मिठाच्या सत्याग्रहाचा विरोधात होतं. आणि भाषण संपायच्या आत मोतीलालजी यांना अटक झाली. कारागृहातून  मोतीलालजीनी महात्मा गांधींना पत्र लिहिले तेही अगदी त्रोटक होतं ते म्हणजे 'करने से पहलेही देख लिया' आणि हीच करके तो देखो ची ताकत होय.



          आज करके तो देखो देखो ची ही नवी कडी पावसामुळे आठ दिवस पुढे ढकलली होती. परंतु आजचा मुलांचा उत्साह पाहता, आपणच मुलांच्या बाबतीत कमी पडतो की काय? अशी साशंकता निर्माण झाली.


     आज सकाळपासूनच क्रीडांगण अगदी रंगीबेरंगी कपड्यांनी नटून गेलं होतं. पावसाचा थोडा अंदाज होता, परंतु तो आला नाही, मुलांपेक्षा मुलींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. विशेषतः आट्यापाट्या, सूर पाट्या, कबड्डी, खो-खो, एवढेच काय लांब उडी, 100 मीटर धावणे, वॉलीबॉल, असे अनेक क्रीडाप्रकार.

   आज सकाळपासूनच क्रीडांगणावर मुलांची आणि मुलींची गर्दी होती. रंगीबेरंगी कपड्यातून मुले-मुली इकडून तिकडे फिरत होती. कार्यक्रम सुरू व्हायला जरासा वेळ होता. ढगही दाटून आले होते. त्यामुळे वातावरण अगदीच अल्हाददायक आणि उल्हासित करणार होतं. कदाचित तास नाहीत म्हणून ही मुलं खुश असतील.



 उद्घाटनाचा कार्यक्रम संपला. उद्घाटनाच्या मध्येच यावर्षी पहिल्यांदाच धनुर्विद्या हा खेळ नव्याने मांडला होता. यापूर्वीसुद्धा कयाकिंग, कानॉइंग, रोईंग, बोटिंग हे नव्याने सुरू केले होते. जेव्हा उद्घाटन संपले आणि सर्व मुलं वेगवेगळ्या ठिकाणी, तेव्हा वातावरण एकदम क्रीडा मय झाले होते.   100 मीटर धावणे, नेमबाजी, कुस्ती, वॉलीबॉल, खोखो, कबड्डी, सूर पाट्या, आट्यापाट्या, लांब उडी, उंच उडी, अडथळ्याची शर्यत, भुजबळ सरांनी खास तयार केलेले त्यांच्या संशोधनातील लवचिकता चेक करणारे नानाविध खेळ, प्रत्येक मुलगा उत्सुकतेपोटी काही ना काही खेळत होता. अर्थात हे काही अगदीच खेळाडू म्हणून खेळ नव्हते, हे होते केवळ खेळाकडे आकर्षित करण्यासाठीचा केलेला प्रयत्न,




 करुन तर बघा!
 कबड्डी म्हणून तर बघा !
बॅडमिंटनची रॅकेट हातात घेऊन तर बघा !,
वॉलीबॉल चे वजन तर बघा!, सोफ्टबॉल आणि बेसबॉल मधला फरक तर समजून घ्या !,
कबड्डी कबड्डी म्हाणा तर खर!,
लांब उडी टाकून तर बघा!,
 गोळा फेकुन तर बघा?,
 खोखो खेळून तर बघा!,
नेम चुकेल कदाचित पण बाण मारून तर बघा,

 या व अशा प्रेरणेने या करके तो देखो उपक्रमाची आखणी केली होती,

     मागील नऊ वर्षात करके तो देखो या  उपक्रमाने वेगवेगळ्या माध्यमांनी दखल घेतल्यामुळे एक उंचीवर महाविद्यालयाला नेले आहे. विशेषतः करके तो देखो नावाची तीन तासाची फिल्म या माध्यमातून तयार करता आली.  24 मिनिटांची एक शॉर्टफिल्म सुद्धा तयार केलेली आहे. ज्यामध्ये संस्था अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील यांचा बॅकग्राऊंडला आवाज आहे तर काही ठिकाणी ते प्रत्यक्ष बोलत आहेत, संस्थेचे सचिव मुकुंद शेठ शहा, संस्थेचे उपाध्यक्षा पद्माताई भोसले, संस्थेचे माजी सचिव अध्यक्ष श्री गोकुळशेठ उर्फ भाई यांनी या फिल्ममध्ये उपस्थिती दाखवली आहे, बाकी फिल्म फिरत राहते ती वेगवेगळ्या खेळाडूंवर. करके तो देखो यश म्हणजे या करके तो देखो च्या माध्यमातून प्राध्यापक भुजबळ यांना युनिव्हर्सिटीचं अवॉर्ड मिळाले तर त्यांचाच एक रिसर्च पेपर आविष्कार या  मा. राज्यपाल आयोजित स्पर्धेमध्ये मांडला गेला.

        यातून अनेक खेळाडू तयार झाले, नुसते खेळाडू तयार झाली नाहीतर एक एकसंधपणा महाविद्यालयात आणण्यासाठी या उपक्रमाचा खूपच उपयोग झाला. वास्तविक जी मुलं हुशार असतात ती खेळाडू म्हणून अतिशय चांगले असतात आणि अर्थातच खेळाडू म्हणून जी मुलं असतात ती चांगली पण असतात, अभ्यासात छान प्रगतीही करतात.
    काही खेळाडूंची नावे सांगता येतील त्यामध्ये श्री सागर मारकड जो प्रो कुस्ती स्पर्धे मध्ये खेळला. महाडिक जो भारतातर्फे खेळण्यासाठी ज्याची निवड झाली सॉफ़्टबॉल  , बेसबॉल,अथलेत, साक्षी राऊत
वैष्णवी शिंदे, संजीवनी  ढवळे , पुजा मोहिते, मैथली शिंगाडे   राष्ट्रीय  स्तरावर निवड
योगेश मोरे, आमोल वाघ, रोहीत हेगडे , अमित राऊत, योगेश किरकत, नागेश तरटे, रणजित देवकर , साहिल बागवान, सुर्यवंशी   सचिन , वैभव जगताप, कबड्डी , ज्युदो, बेसबॉल, सॉफ्टबॉल, कुस्ती या खेळात राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त हड़ खेळाडू आहेत  अनेक विद्यार्थी सगळ्यांची नावे सांगणे अशक्य आहे या माध्यमातून पुढे आलेली आहे ज्या महाविद्यालयात खेळाडू चांगले असतात त्याच महाविद्यालयात इतर गोष्टी सुद्धा चांगल्या करता येतात. याचे क्रेडिट विद्यार्थ्यांना देता येईल का? असा विचार करत आहोत अशक्य काहीच नसतं या विद्यार्थ्यांना फिजिकल फिटनेस शिक्षा म्हणून न वाटता शिक्षण म्हणून झाला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

      मा पंतप्रधानांनी खेलो इंडिया ही संकल्पना मांडली आहे. वेगळे महत्त्व प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी खेळाडू ग्रामीण भागात नाहीत असे नाही.  प्रत्येक महाविद्यालयातून, अगदी शाळा पातळीपासून खेळ खेळावेत आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले तर शक्य आहे.
        नीट च्या नावाखाली, सीईटीच्या नावाखाली त्यांना दोन वर्षे काहीच करू देत नाहीत, आणि म्हणून या विद्यार्थ्यांची ही आयुष्यातील दोन वर्ष ही फक्त अभ्यास एके अभ्यास म्हणून  जातात.
       यात कुठेतरी बदल करता येईल का? खेळाचे महत्त्व वाढवता येईल का म्हणून हा लेखप्रपंच!
        चला तर खेळायला प्रवृत्त करूयात !
खेळुयात!!
 खेळू देऊयात!!!!
करके तो देखो,
 करून तर पहा
खेळासाठी आपल्या पाल्यांना प्रवृत्त तर करा !
धन्यवाद

संजय चाकणे
ज्ञानसुत
नऊ ऑगस्ट १९

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट