हे राम ,
हे महात्मा,


गांधी मनामनातला
आजही जिवंत आहे,
गांधी शिक्षण धोरणातला,
गांधी स्वच्छ अभियानातला,
गांधी टोपीतला,
खादीतला,
शेळीच्या दुधाचा,
सत्याच्या प्रयोगातला,
गोलमेज, पुणे करारातला,
खेड्यातला,
गांधी पंचक्रोशीचा
गांधी साध्या रहाणीचा
सत्याग्रहाचा,
चले जाव चा,
करके तो देखो
म्हणणारा,

तू
गांधी विज्ञानातील
गांधी अंशाअंशाने
कणा कणाने
आजही टिकून आहे,.
मनात गांधी असला की अहिंसा सांगावी लागणार नाही,


हे महात्मा तुझ्यावर,
आज सहज विनोद करतात,
तुझ्या अर्ध नग्नतेवरून
तुझ्या उपासावरून,
मजबुरीवरून,
तर काठीही सुटत नाही
अपवाद नाही तुझे केसरहित
डोके,
कारण,
 तू आजही मनांत
खोलवर रुजलायस,
पुन्हा नव्या अंकुरानी
क्षणोक्षणी कोंभारुन येतोस,
थोरले झाड होऊन कोलमोडतोस
पण,
अब्जावधी बिजांकुरांनी,
पुनः उभारी घेतोस,
तू महा आत्मा आहेस हे वारंवार
सिद्ध करतोस,

आज दिडशे वर्षांचा तरुण झालास
तू नाही बुढ्ढा होणार,
जगाच्या विनाशापर्यंत,
तू तेजाने तळपत
राहणार,
तू अवतारी होतास की नाही
माहीत नाहीस
पण सामान्यांच्या मनातला देव आहेस
तुझी तालीम
नव्याने मांडतील
नयी तालीम
अंगीकारतोय,
नव , अखंड भारत

तुझ्या विचारांना
विनम्र अभिवादन...
 हे राम

*ज्ञानसुत*



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट