*परीक्षेला पर्याय काय?*

नुकत्याच परीक्षा संपत आल्यात 10 वी व 12 वी च्या परीक्षा पाहिल्या तर वास्तव भयानक आहे, कॉपी चे प्रमाण, करण्याच्या नानाविध पद्धती, पालकांचा दुर्दैवाने सहभाग व शिक्षकांचा सहभाग पाहिला की विषण्णता येते,
कॉपी करण्याच्या क्लुपत्यांवर पीएचडी होईल, ओढणीवर नक्षीदार लिहिन्यापासून, शर्टच्या बाह्यांच्या मनगटात शिप्याकडून खास कप्पे शिवणे, भिंतीवर, बेंचवर पॅड वर लिहिणे, हे झालं पारंपारिक,
नको तिथे मोबाइल लपवणे, स्मार्ट घडयाळात लिहून आणणे,m c q ला खाणाखुणा करून इशार्याने सांगणे , हे सगळं सृजनात्मक म्हणजे क्रूजनात्मक
आहे,
12 वीचा निकाल सहज 90% लागतो , वर्षभर प्रात्यक्षिकाना न बसणारे विद्यार्थी पैकीच्या पैकी गुणांची अपेक्षा करतात, oral चा नावाखाली गूण वाढवणे एव्हढाच agenda दिसतो,
हीच मुलं जेव्हा FY ला प्रवेश घेतात, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना आठवी / नववीत शिकलेल्या बाबी सुद्धा धडपणे सांगता येत नाहीत
8वी पर्यंत नापास न करण्याचा निर्णय योग्यच होता, त्याची अंमल बजावणी मध्ये दोष राहिले, आपण कमी पडलो. इतके दिवस आपण म्हणायचो मुलं परिक्षार्थी होतायेत आता तेही नाही
  इंग्रजी माध्यमातून शिकलेल्याना धड मराठी येत नाही आणि इंग्रजी कळत नाही प्रथम वर्षांचा  निकाल 50% च्या खाली लागतो,  इंजिनियरिंग ला FE ला दोन,तीन वर्षें गटांगळ्या खातात त्यावेळी उच्च शिक्षणात काहितरी चुकते आहे असे वाटते, सगळीकडे हे सत्य नसेलही पण मोबाइल चा वापर करण्याची पद्धत, कलास चालकानी तयार केलेले ग्रुप, त्यावरून उत्तरे पाठवण्याची पद्धत सगळं अनाकलनीय,
   CCTV कॅमेरे बसवणे, पोलिसांची संख्या वाढवणे, सगळ्या घटकांनी एकत्र येऊन प्रसंगाला सामोर जाणे, पर्यवेक्षकांना बळ देन असे पर्याय होऊ शकतात,
  परीक्षेलाच पर्याय शोधावे लागतील, विद्यार्थी संख्या वर्ग निहाय कमी करणे, खासगी क्लासवर बंदी आणणे तर काळाची गरजच झालीय, पालकांना असलेली मार्कांची हाव कमी करणे, मलातर नेहमी वाटत पास किंवा नापास बस नो ग्रेडिंग, त्या वर्गात विद्यार्थ्याला ठराविक ज्ञान मिळालं , त्याला येतंय हे कळलं की पुढच्या वर्गात ढकलायच, हुशार मठ्ठ असा भेदाभेद अमंगळ मानायचा, मानसिकता बदल्याणासाठी अनेक शिक्षण तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन तोडगा काढायला हवा,
  शून्य कॉपी धोरण राबवायला हवे इंग्रजी च्या पेपर ला कॉपी करता येत नाही, तस काही करता येईल, theory पेक्षा प्रॅक्टिकल वर भर द्यायचा, विद्यार्थी वर्गात आलाच पाहिजे असा अभ्यासक्रम करावे लागतील
कुणा एका घटकाला दोष नको द्यायला, सर्वजण एकत्र येऊन काहितरी करू
या

 , , , *संजय चाकणे*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट