जिंदादिल


जिंदादिल


दु:खाला कवटाळनारी माणसे
वरून खूप हसरी असतात
कितीही फसवी असली तरी
आतून मात्र कोसळलेली असतात

आतून सुखावलेली माणसे
दु:खाचे डोंगर उभे करतात
आपण सुखी राहून
इतरांना भारी यातना देतात

सुख काय दु:ख काय
सारे मनाचेच खेळ
मग का घालवावा
इतरांसाठी आपला वेळ

आपण आपल्या
मस्तीत जगावं
हसाव रडावं
कस जिंदादिल असाव 
………………संजय चाकणे 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट