माझी गडगिरी भाग – ०३





                                          माझी गडगिरी भाग – ०३भूलभुलैया वज्री लोहगड –लोहगड – विसापूर या किल्याची जोडगोळी सर करणे हा तसा माझ्या गिरीभ्रमणातला आवडीचा ट्रेक. लोहगड हा लोहपुरुषासारखा वर्षानुवर्षे उन्हा, वाऱ्यात, धो-धो पावसात समर्थपणे वज्रासारखा उभा आहे. अत्यंत मजबुत असणारा, चढाईसाठी सोपा असणारा, सतत आकर्षित करणारा किल्ला आहे. भांजे गावच्या लेण्यामध्ये बौध्द स्तुपासमोर अत: दीप भव चा जप करुन बुध्दम शरणंम गच्छामी धम्म शरणंम गच्छामी सघं शरणंम मच्छामी ची पारायणे करुन लेण्यांमध्ये फिरुन थंड पाण्याचे सपकारे अंगावर घेत लोहगडाकडे रवाना व्हायचे असा नेहमीचा शिरस्ता यावेळी पुण्यातून आम्ही ७० जण निघालो.
            खास पावसात भिजण्यासाठी या सफरीचे आयोजन केले होते. पायथ्यापासूनच धो-धो पाऊस सुरु झाला. निम्म्या रस्त्यात गेल्यावर पठारावर बसून सोबत आणलेल्या शिदोरीचा तशा पावसात फडशा पाडला. सगळयांनी बरोबर जायचे असे ठरले होते परंतु लोहगडावर इतक्या पायवाटा आहेत की, कोण कुठल्या वाटेने गेले हे कळायला मार्ग नव्हता. मागे एकदा लोहगड चुकलो होतो. पण त्यावेळी तासात मुळ वाटेला आलो होतो. यावेळी मात्र पावसाचा जोरदार तडाखा, रापचिक पाउस त्यात घनदाट झाडांची गर्दी असल्याने पडणाऱ्या पावसाचा कर्णकर्कश्य आवाज रोद्रतेत भर घालत होता. आमच्या पुर्ण ग्रुपची चांगलीच पांगापांग झाली. काही रानवाटेने गेले, काही पायवाटेने गेले तर काही मुळवाटेने गेले. मुलांचा उत्साह एवढा दांडगा होता की, त्यांना कधी एकदा गड चढतो, असे झालं होते. प्रत्येकाला आपलीच वाट बरोबर आहे असेच वाटत असणार. लोहगडाच्या पायऱ्या जेथे सुरु होतात तेथे आमचा ग्रुप पोहोचला. थोडयाशा अवधीत गटागटांनी मुलं आली. आम्हीच कसे बरोबर असे प्रत्येक गट सांगत होता.            एका गटांन प्लॅस्टिकच्या पिशवीत काहीतरी आणलं होतं. त्याच बरेचशे केस होते. तो गट मात्र घाबरलेला होता. त्या गटातील एकजण घाबरत-घाबरत सांगत होता ही बिबटयाची विष्टा आहे. असे सांगितल्याने लांब-लांब बसलेले सुध्दा जपळ येऊन बसले. उरलेले सर्व गट येण्याकरीता अजून दीड तास गेला. खात्रीशीर बिबटयाच आहे असे समजल्यामुळे आम्ही सगळे आता मात्र एकजुटीने चालत होतो. एखादा प्राणी खाल्यावर विष्ठेत केस असतात असे छातीठोक पणे सांगणारा एक होताच. समजा बिबटया आलाच तर काय करायचं याच्या वल्गना सुरु झाल्या होत्या. काहींनी मानसिक समाधानासाठी काठया, दगड हातात घेतले महादरवाज्या पासून गडावर पोहचलो. आता मात्र लख्ख ऊन पडलं होत. पोहण्याच्या जलाशयात तुंग तर पलीकडे नजरेच्या टप्यातला तिकोना खुनावत होता. गडावर गेल्यावर शिलालेख, गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनमंतरायाचे दर्शन घेऊन शिवमंदीराकडे गेलो. गडावरील प्रसिध्द अष्टकोनी तलाव पाहूण विंचूकाटयावर गेलो. विंचूकाटा अर्थात विंचूमाची, विंचवाच्या नांगीसारखी असून ३० ते ४० मी. रुंद तर जवळ-जवळ १५०० मी. लांब आहे. गडावरुन पुन्हा खाली उतरलो उतरत असताना एक आजोबा भेटले आमच्यातल्या उत्साही कार्यकत्यांने त्यांना त्या पिशवीतील विष्टा दाखविली आणि आजोबा म्हणाले ही तर रानमांजराची विष्टा हायसं वाटलं आणि आतापर्यंत बिबटया आडवाच येणार या भ्रमाचा आमचा भोपळा फुटला. लाठया, काठया, दगड कुठल्या कुठे फेकुन दिली. आजोबांनी सांगितले की, येथे रानमांजराची खुप संख्या आहे. तरीसुध्दा उतरताना मात्र सगळे एकजुटीने उतरत होते. स्वत:च स्वत:ला हसत होते.            वाट निसरडी असल्याने झाडांच्या गळलेल्या पानांवरुन पाय घसरत असल्याने काही जणांनी जमिनीला आलिंगन दिले होते. त्यामुळे काही जण पुढून तर काही जण मागून लालमातीमुळे लालभडक दिसत होते. जे पडले नव्हते ते हसत होते आणि थोडे पुढे जाऊन पडत होते. आम्ही मळवली रेल्वे स्टेशनपर्यंत पायी आलो आणि लोणावळयावरुन येणाऱ्या लोकलमध्ये वेगवेगळया डब्यात बसलो. पुणे स्टेशनला जेव्हा उतरलो तेव्हा आम्हीच ओलेचिंब बाकी सर्व कोरडे ठाक होते. पुणे स्टेशनचा सोपान चढताना लोक आमच्यामडे कौतुक भरल्या नजरेने बघत होते कारण आम्ही ओले होतो. ही लोहगड वारी लक्षात राहिली ती म्हणजे बिबटयाच्या धास्तीने आणि चुकलेल्या वाटांनी.            इतिहास जिथे घडला तिथे जाऊन तो शिकण्यात मजा आहे. थोरल्या आबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड पाहूयात. गडाची भटकंती करुयात            गडप्रेमी,                                                                                                                                    ज्ञानसूत                                                                                                                           डॉ. संजय चाकणे






x
x

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट