*शिरगोळे अर्थात गारगोटी*

     रांगोळीचे दर्शन आपणा सर्वांना अत्यंत मनमोहक नेत्रसुखकारक असते, हल्ली तर नानाविध प्रकारच्या रांगोळ्या काढ्ल्या जातात. रांगोळीचे वर्ग असतात. त्यात भडक रंग भरले की नजारा आणखी उठावदार, प्रफुल्लीत चित्ताकर्षक होतो.

आपण कधी विचार केलाय का ? रांगोळी कशी बनते ? रंग कसे तयार होतात ?

 वापरले जाणारे रंग बहुतांशी मेटॅलोथॅलोसायनाईडचे बनतात जे विषारी असतात

आमच्या लहाणपणी दिवाळीच्या आधी, रानोमाळ हिंडून शिरगोळे / गोटे गोळी करण्याची अहमहमिका लागायची. ते गोळा करायचे, उखळात किंवा बत्त्यात घणाने किंवा दगडाने कुठायचे त्याची जाङ धोतरातून वस्त्र गाळ पुड करायची ' अंगण शेणाने सारवायचे व सुबक  रांगोळी रेखाटायची. हळदी, कुंकुं, अबीर, बुक्का, काव जागोजागी पेरायची. असा शिरस्ता ठरलेला असायचा. काळाच्या ओघात हे सर्व पडद्याआड गेले

 नुकतेच  सिन्नर जवळील गारगोटी संग्रहालय पाहिले, व खुप हळहळ वाटली की आजपावेतो आपण निसर्गाचा किती ऱ्हास केलाय . प्रत्येक निसर्गसपन्न गारगोटीला केव्हढी किंमत आहे . नानाविध आकाराच्या या गारगोटी पाचू , निलम , पुष्कराज, माणिक लसण्या, पोवळे, जिवाश्म , प्रवाळ, गोमेद, हिरे , अनेक प्रकारांनी युक्त आहेत.
     मुळात शालेय / महाविद्यालयीन विदयार्थ्यांनी आयुष्यात एकदा तरी हे संग्रहालय बघावेच, अनेकविध प्रकारच्या या गारगोटी इथे बघायला मिळतात. जगात फक्त पुण्याजवळील  वाघोलीच्या दगडखाणीत  सापडणारे निळया मोरचुदी रंगाचे Cavansites बघायला विसरायचे नाही.
   आय- कॉलेज मध्ये सध्या आम्ही गारगोटी उदयान तयार करतो आहोत. गरगोटी मिळायची ठिकाणे म्हणजे, माळराने, दगडांच्या पोटात, दगडखाणी, बांधकामे चालू असतांना पाया खातांना, विहिर , नदी नाले त्याचे खोलीकरण जिथे जिथे खोदकाम चालते तिथे गारगोटी मिळू शकते गरज असते पारखी नजरेची.

आपणाला हे निसर्ग वैभव टिकवायचे असेल तर रांगोळ्यांना पर्याय शोधावे लागतील. फुलांच्या पानांच्या रांगोळया पायघड्या घालता येतील का ?
चला तर निसर्ग जपु या. भवताल वाचवुया ॥

संजय चाकणे
*ज्ञानसुत*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट