*सहल / ट्रेक / गिर्यारोहण का व कशासाठी ?*

          मागील वर्षी चावंडगड अर्थात प्रसन्नगड, नाणेघाट व कुकडेश्वर असा ट्रेक झाला, 250 मुले / मुली ३० प्राध्यापक अशा लवाजम्यासह धमाल आली,
        मी खुप भटकंती केली आहे. दरवेळी नव्याने शिकायला मिळतं. कालच्या ट्रेक मध्ये एका तरूणाने मला एक प्रश्न  विचारला की सर काय हो या ट्रेकचा फायदा ?
     वर्षातून एकदा मेडिकल चेक अप करायची गरज नाही, कारण ,
फुफुसांची, ह्रदयाची क्षमता, आपोआप तपासली जाते,
दमा, धाप लागते का ? हे कळते .
पाय लटपटतात का ?
वय झालयं का,?
घाम आल्यावर, चक्कर येते का ?
उत्तर *नाही*आले की, तुम्ही *धडधाकट* आहात हे सिद्ध होते . शुद्ध निर्सगात गेलं की ओझोन च्या बरोबरीने शुध्द हवा अर्थात भरपूर प्राणवायू छातीच्या भात्यात जातो. रक्ताभिसरण जोरात होते. ह्रदयाला बळकटी येते, हालचाली वाढतात, त्वचेला तुकतुकी येते, डोळे झळाळतात, *पेशी न पेशी उत्तेजीत होतात*. सकारात्मक उर्जा मिळते. 
               अजुन मला स्वतःला  एकही गोळी घ्यावी लागत नाही . हेही नसे थोडके, चला तर दोन / तिन महिन्यातून एखादया गडावर, किल्ल्यावर , डोंगरात, सहयाद्रीच्या कडेकपारीत छत्रपतींच्या पावन स्पर्शाने पावन झालेली माती भाळी लावू या ? लेणी ,स्तुप, विहार, पाण्याची टाकी, शिवमंदीरे, सती शिल्पे, वीरगळी, तोफा, बारूदखाने, मुदपाकखाने, पागा, पेव, धान्य कोठारे,  शिलालेख, शिल्प शस्त्र , अस्त्र  जाऊन पाहूया  *फुल बॉडी  मेडिकल चेकअप* करूयात तेही फुकटात .
 
 संजय चाकणे
ज्ञानसुत
५ ऑगस्ट १८
9890171857

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट