ज्ञानवारी

कशाला जाऊ आषाढी कार्तिकी पंढरपुरी I
शाळेचे ज्ञानमंदिर माझी रोजचीच वारी ॥

माझे वर्गातले भान हरपून शिकवणे |
माझे रोजचेच ब्रम्हानंदी टाळी लागणे ॥

खडू ,फळा, डस्टर माझे टाळ वीणा नी मृदंग |
ज्ञानाची पखरण माझा रोजचाच अभंग ॥

पोरं सोरं येतात मन मोकळं कराया I
माझ्यासाठी तोच चंद्रभागेतिरी विसावा ॥

पालक येतात सुख दुःख सांगावया |
विठ्ठल -रुक्मिणी त्यांच्या रूपे भेटावया ॥

*ज्ञानसुत*
१९ ऑगस्ट १८



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट