*

माय म्हटले की माऊली
आणि
माऊली म्हटले की विठ्ठल
अर्थात पंढरपूर.
इंदापूर आणि पंढरपूर हे नातं साधलय ते भीमेने आणि चंद्रभागेने .
भीमेचीच पुढे चंदभागा होते.
माऊली म्हटल की सारं विश्व त्यात सामावल्याचा भास होतो,
माय अर्थात आई.
इंदापूर मध्ये कोणीही यावे आणि मायेने सर्वांना समावून घ्यावे असच इथल सगळ वैशिष्टय .
फ्लेमिंगो जसे दूरदेशीवरून इथे येतात आपल्या पिल्लांना जन्म देतात. मायेचे प्रेम देतात .
त्यांना वाढवून पुन्हा घेउन जातात. तसंच काहीस इथे झालेले आहे.
ती आईची बख्खळ प्रेम देणारी माया. मुळातच माया हा शब्द मायवरून आला आहे.
माय जे प्रेम करते आणि त्यातून जे उत्पन्न होते त्यालाच माया म्हणतात. म्हणून हे जे मायाळू स्वरूप आहे, आईच्या या प्रेमापोटी प्रत्येकाने भरभरून लिहीलेलं आहे.
आई, माय, ममता, माँ, मदर या सगळ्याच शब्दांमधून विविध भाषेतील साहित्य समृद्घ झालेली आहे.
कवी ग्रेसपासून ते फ. मु. शिंदेपर्यत अनेकांनी आईवर लिहीले आहे. अर्थात नव कवी जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या आईबद्दल काहीतरी लिहितोच.
जसा तो प्रेमावर लिहतो तसा तो आईवर ही लिहतो.
 म्हणूनच
या आईबद्दलच्या प्रेमाला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे.
हे लिहीत असताना मला माझ्या आईची सातत्याने आठवण येते आहे '
माझी आई सुमन ज्ञानेश्वर चाकणे सगळे तिला लाडाने मनावहिनी, मनाबाई तर वडील तिला लाडाने मना म्हणायचे. आज ती नाही या जगात, पण तरीसुध्दा तिने आम्हा सगळ्यांना ज्या पद्धतीने वाढवले.
रुढ अर्थाने अडाणी होती,
आम्हीच तिला सही करायला किंवा मुळाक्षर लिहायला, गिरवायला शिकवले.
 पण नाती 'आम्ही शिकाव म्हणून तिने जो प्रयत्न केला म्हणून माऊली ग्रेट ठरते.
संत तुकाराम महाराजांची पालखी, तुकोबा माऊलींची पालखी इंदापूरात येते. मग ती पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जाते. ती जी गळाभेट असते ज्ञानेश्वर माऊलींची आणि  तुकोबा माऊलींची , वाखरीची, ती बघण्यासारखी असते. मला वाटते हा माऊलीचा जो संदेश आहे तो आपणा सगळ्यांना समजला पाहीजे. यात सगळ आलं.
माऊली म्हंटल की त्यात समावून घ्या. मायेच रूप धारण करणं त्या मायाळू रूपाला साजरं करण,
चला आपण चं माऊली होऊ या !

*ज्ञानसुत*
 संजय चाकणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट