*भांडगाव म्हसोबा चे तेल* 

         
       माझे मित्र प्रा. उत्तम माने यांच्या आग्रहा खातर मी भांडगावच्या म्हसोबाला गेलो होतो.
वास्तविक भांडगाव हे नॉनव्हेज टुरिझम अर्थात  मांसाहारी पर्यटनासाठी पुणे जिल्हयातील खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेले अत्यंत धार्मिक गाव. गेल्या सात वर्षात भांडगावला जाण्याचा माझा हा दुसरा प्रसंग. यावेळी मात्र देवस्थानात जाता आले. खोबरेल तेल जळाल्याचा वास येत होता करवंट किंवा शेंडी जाळल्यानंतर येतो तसा, अर्थात एखादा यज्ञ चालू असावा असे वाटले ,परंतू लक्षात असे आले की मंदीरा शेजारीच लोखंडी बंब ढॅन् ढॅन ' पेटलेले होते आणि त्यातूनच हा वास येत होता
पावले आपसूकच तिकडे वळली देवस्थानच्या मंडळींनी कुणीतरी उत्सुकता दाखवतय?  म्हणून अतिशय तन्मयतेने प्रकल्प समजावून सांगितला एकंदरीतच सगळ्या देवस्थानांनी आदर्श घ्यावा असा हा प्रकल्प
देवाला फोडलेले नारळ एकत्र करूण ते एका ड्रायरमध्ये टाकले जातात मग शेंडी व करवंट्या वेगळ्या केल्या जातात , खोबरे व त्याचे तुकडे  क्रशरमध्ये घालून घाण्यात आणले जातात त्यातून पेंड वेगळी होते व तेलाचे गाळप होते. तेल फिल्टरमधून काढल्या नंतर शुद्ध स्वरूपात विक्रीस उपलब्ध  होते. या खोबरेल तेलाची रूपये १६० प्रमाणे विक्री केली जाते. प्रसादरूपी ह तेल घ्यायला झुंबड उडते हे सांगायला नको !
२ ते अडीच लाखांच्या या प्रकल्पामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत जसे प्रसादाची हेळसांड थांबली, खोबरे पायी तुडवले जात नाही व स्वच्छता कायम राहायला मदत होते. तेल व पेंड विक्रीचे
उत्पन हा बोनसच म्हणायचा .
जाता जाता सहज आठवले म्हणून सप्तश्रृंगी गडावर श्री सुदर्शन दहातोंडे यानी नारळाचे पाणी शेतीसाठी वापरले आहे .
अशा प्रकारचे प्रयोग सर्व देवस्थानांनी अंगिकारले तर केव्हढा फायदा होईल.
देवस्थानने नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविला असला तरी जेवणावळी च्या ठिकाणी अतिशय अस्वच्छता आहे, यासाठी खुप काही करायची गरज आहे,


ज्ञानसुत
संजय चाकणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट