सर काय वाचू,?


सर काय वाचू ?
असे अनेकजण विचारतात,
मी मात्र काय वाट्टेल ते वाचा,!
ज्यात मन रमतय ते वाचा!
असे सांगत असतो
 अगदी बाबा कदम किंवा बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबरीपासून सुरुवात करून
 *हिंदू एक जगण्याची अडगळ* पर्यंत काहीही वाचावे,
कुठलेही लिखाण वर्ज्य असता कामा नये, कप्तान बेलवळकरांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या पासून श्रीमान योगी मृत्युन्जय , जिप्सी, ययाती, छावा , मूकनायक, युगंधर, काळेपाणी , बुद्ध व त्याचा धम्म, समग्र फुले, उचल्या, झोंबी, अक्करमाशी, बलुतं,  निळी पहाट, समग्र पुलं, समग्र व पु, दमा,  धनंजय कीरांची सगळी चरित्र, गो निदांच बये दार उघड, तुंबाडचे खोत ताम्रपट, पानिपत, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज, बुधभूषण, ज्ञानेश्वरी, बायबल, कुराण,संत तुकारामांची गाथा, भारुड सर्व संत साहित्य दासबोध, अच्युत गोडबोले  यांचे मनात, किमयागार,अर्थात, अर्थाच्या शोधात, पूर्वरंग, अपूर्वाई, माझी गडगिरी, राष्ट्रीय सेवा योजना वरची पुस्तक, आपत्ती व्यवस्थापनाची पुस्तक, दलित साहित्य ग्रामीण साहित्य
अशा  लिखानापासून महेंद्र कदमाच्या आगळ सारख्या,
पुपुल जयकर किन्वा अशोक जैन यांच्या अनुवादाने तर साहित्य समृद्ध झालेय, अंतिम पर्व पासून गॉडफादर, अग्नीपंख असे सर्व काही,

    *दिसामाजी काहीतरी लिहावे प्रसंगी  अखंडीत वाचीत जावे*

 कलामांना सलाम
वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा
संजय चाकणे
9890171857

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट