*ज्ञान लुटण्याचा दसरा*


              दसरा '
 विजया दशमी
दहा दिवसांच्या मातीच्या उत्सवाचा आनंद,
पृथेला पाण्याची आच ,
घटाला लागणारे तृणधान्य
 त्यातून टरारून येणारे कोंभ,
माती परीक्षण,
पाणी परीक्षण ,
धान्य परीक्षण ,
सगळं दहा दिवसात
कमी खर्चात.
पुण्यात म्हणे घटाची माती पण विकतच आणतात. कर्मकांड उरलीत.
 का ?
कशासाठी ,
प्रश्नच पडत नाहीत.
       आपट्याची पानं म्हणून सर्रास अंजन वा कांचन वृक्षाची  मोठया प्रमाणात कत्तल होतीय ,
आपट्या ला
पर्याय शोधता येतील का ?
आपट्याची रोपेच ,बिया लुटल्या तर ?
चला,
 विचार तर करु या ?
गेला बाजार ज्ञानच लुटलं तर
विजया दशमीच्या
निमित्ताने इानपिपासु
अर्थात ज्ञानलुटेरे होऊ या .
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

संजय ज्ञानेश्वर चाकणे
 ( *ज्ञानसुत* )

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट