गिनीज साकारतांना


एखाद्या व्यक्तिने, माणसाने किंवा समूहाने जेव्हा जागतिक गिनीज रेकॉर्ड करायचं ठरवलेलं असतं तेव्हा, त्यावेळी, दिसताना ते सोपं वाटतं परंतु जेव्हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार होतं त्यावेळी त्या व्यक्तिचं समूहाचं ती त्या देशाची शान असते ते रेकॉर्ड हे त्या देशाचा असतं मी जेव्हा पुणे विद्यापीठांमध्ये आत्ताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्रम समन्वयक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे काम करायचो, त्यावेळी रक्तदानाचा आकडा 46 हजार दरवर्षी व्हायचा. त्यावेळी मला नेहमी वाटायचं  की  जगाचं  वर्ल्ड रेकॉर्ड 40,000 आहे आपण तर 46000 रक्तदान करतो आणि फार कष्ट न घेता एवढा आकडा येतो मग आपण का नाही रेकॉर्ड करायचं? पण सांगू का? या सगळ्याची पद्धती माहीत नव्हती?  कसं करायचं? कोणाला भेटायचे?  सल्लागार कोणाला नेमायचे? यासाठी काय काय लागतं? अर्ज कसा करायचा? अर्जदार कोण असणार? असे अनंत प्रश्न होते. राहिले ते राहिलेच:

        मी इंदापूरला आलो आणि आता व्यवस्थापन परिषदेवर आल्यानंतर श्री राजेश पांडे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्याबरोबर चर्चा होत असताना आपण गिनीज रेकॉर्ड करायचं का? रेकॉर्ड करायचं का? असं सातत्याने चर्चा होत होती आणि टीम तयार झाली आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की आपण 50 लाख पत्रावळी वाटप करतोय तर त्याचंच रेकॉर्ड करू श्री मिलिंद वेर्लेकर यांना सल्लागार म्हणून नेमले आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यावर असं लक्षात आलं की आपण पत्रावळी वाटपाचे रेकॉर्ड नाही करू शकत. गिनीज रेकॉर्ड करताना ते पुन्हा कोणीतरी मोडलं पाहिजे. असा संकेत आहे आणि मुळात पत्रावळी हा प्रकार आपल्याच देशात आहे. त्यामुळे तो इतर देशात असणारच नाही. त्यामुळे त्याचा रेकॉर्ड करता येणार नाही. म्हणजे पंढरपूरच्या वारी मध्ये इतकी लोकं एकत्र येतात शेवटी आकडा दहा लाखापर्यंत जातो असं सांगितलं जातं. मग याचा रेकॉर्ड होऊ शकतो का? तर, नाही होऊ शकत? कारण अशा प्रकारची वारी दुसरीकडे कोठेही नसते. आणि म्हणून त्याला रेकॉर्ड म्हणत नाहीत. गिनीज अशाच रेकॉर्डला मान्यता देते जे इतरांना मोडता येईल. तुमचंच रेकॉर्ड तुम्ही मोडणं याला फार काही महत्त्व नसतं. मग कशाचं रेकॉर्ड करायचं?  असं म्हटल्यानंतर श्री मिलिंद वेर्लेकर म्हणाले मी दोन दिवसात सांगतो.

          मा. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर प्र. कुलगुरू डॉ. नेहरू उमराणी आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार या सगळ्यांनी या सर्व प्रकाराला अत्यंत मनापासून सहकार्य केले आणि मग आम्ही एक समिती नेमली ज्यामध्ये अधिसभा सदस्या बागेश्री मंठाळकर आणि अर्थातच या सगळ्याचे समन्वयक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई डॉ. मोहन वामन मी अशी अनेक मंडळी सगळ्यांची नावं इथे लिहू शकत नाही एवढ्याच सहकार्य यामध्ये होतं. आणि मग दोन दिवसांनी मिलिंद वेर्लेकरांनी आम्हाला सांगितलं की एकाच ठिकानी झाडं वाटण्याचा अर्थात रोपं वाटण्याचा कार्यक्रम आपण करू शकतो का? मी अंदाज बांधला इंदापूरच्या नगराध्यक्षा आणि संस्थेचे सचिव यांनी एक नर्सरी तयार केली आहे. जवळपास अडीच लाख रोप असतात. मी म्हणालो ठीक आहे 20 हजार रोपं इंदापूर वरून आणता येतील कारण हे शहा कुटुंबीय दरवर्षी अडीच ते तीन लाख रोपं पाणी फाउंडेशनला मोफत वाटतात. जिथे झाडं लावली जातात त्याचं रेकॉर्ड ठेवतात त्यामुळे ही झाडं मिळतील याची मला खात्री होती मी त्यांना फोन केला ते म्हणाले की रेकॉर्ड होणार असेल तर त्यात आमचाही खारीचा वाटा, आम्ही रोपं द्यायला तयार आहोत. दोन तीन दिवसांनी वेर्लेकरांनी सांगितलं की विक्रम हा एकाच प्रकारच्या रोपांचा आहे.


मग आता एकाच प्रकारची कसली रोपे? रोपांच्या पुन्हा कोणीतरी विषय काढला की आपल्याला देशी वाणाची रोपे पाहिजेत! आम्ही कडुनिंबाच्या रोपांची निवड केली, जी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने दिली. पुन्हा चौकशी केली तर कळलं की दुबईच्या एका शाळेने  9371 असा रेकॉर्ड केला आहे हे रेकॉर्ड तोडायचं म्हटल्यावर आपल्याला थोडे जास्त म्हणजे किमान 12000 धरायचं कोणी तरी म्हटलं की राष्ट्रीय सेवा योजनेची संख्या 50000 आहे मग आपण मोठा विक्रम करूया मग सर्वानुमते ठरले 15 हजार करू. कार्यक्रम कुठे करायचा तर बालेवाडी ला करायचा? बालेवाडी ला कार्यक्रमाची परवानगी घ्यायची, वीस हजार विद्यार्थी बसणं! असं सगळं बघितल्यावर लक्षात आलं की, हे थोडं अशक्यप्राय आहे. एक कल्पना अशी आली की बालेवाडीत न करता आपण विद्यापीठाच्या ग्राउंड वर केला तर आणि तात्काळ सगळ्यांनी हो म्हटलं. गिनीज चे छायाचित्र फोटो जेव्हा ड्रोन कॅमेऱ्यातून काढले जाईल त्यामध्ये विद्यापीठाची इमारत सुद्धा दिसू शकेल अशी भावना यामागे होती. क्रीडांगणाचा शोध सुरु झाला लक्षात आले की साधारण 15000 आपण म्हणतोय पण एकंदरीतच 20 ते 22 हजाराची संख्या असणार कदाचित त्यापेक्षा जास्त मग आपल्याला फुटबॉल ग्राउंड घ्यावं लागेल. आणि त्याप्रमाणे आम्ही तयारीला लागलो एकेक गोष्ट वाढत गेली सुरुवातीला अत्यंत सोपे वाटलेलं हे काम किती कठीण आहे याची आम्हाला जाण होत गेली कारण वेर्लेकर मध्ये मध्ये आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असत जसे की पाच फुटाची कनात बाहेरून टाकावी लागेल आत विद्यार्थ्या व्यतिरिक्त एकही माणूस येता कामा नये. ठराविकच संयोजक किंवा अर्जदार व सुत्रधार ठेवावा लागेल.
त्यामुळे कोणी आत राहायचं? कोणी बाहेर थांबायचं कोणी काय काय करायचं? याच्या चर्चा सुरू झाल्या तेवढ्यात मिलिंद ने फतवा काढला की आपल्याला 50 X 50 ग्रीड ची योजना आखावी लागेल. त्यासाठी आर्किटेक्ट नेमावा लागेल. नंतर मधल्या काळामध्ये अजून एक फतवा आला आपल्याला 50 वकील लागतील आपल्याला 450 स्टुअर्टस लागतील

आपल्याला 75 ॲटर्नीज लागतील 36 कॅमेरे लागतील पंधरा दरवाजे करावे लागतील खरं सांगू का या सगळ्याचं आयोजन समितीतील प्रतयेकाला प्रचंड दडपण येत होतं पण तरीसुद्धा घेतला वसा टाकायचा नाही या न्यायाने आम्ही पुढे पुढे जात होतो. या सगळ्या घटनाक्रमाच्या साक्षीदार खरंतर बागेश्रीताई होत्या त्या मिलिंद सरांकडून टेन्शन घ्यायच्या आणि आमच्यावर टेन्शन टाकून द्यायचा. ताण वास्तविक यायचा तो ऑफिसमधले स्वामी, दिनेश, दत्ता रास्ते आणि अर्थातच आम्ही सगळे. सगळ्यात जास्त ताण घेतला तो डॉ. देसाईनी एक दिवस कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि खूप सारा ताण त्यांनी आमचा ताण हलका केला कारण या 15 हजार विद्यार्थ्यांना जेवण द्यावं लागेल, बिस्किट द्यावी लागतील, गोळ्या वाटाव्या लागतील कारण 7 वाजता आल्यानंतर 9 ला गेटमधून आत घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना 11 ला बाहेर सोडायचं. तोपर्यंत काहीही खाता येणार नाही व या वाटपाची सर्व जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतली.




दरम्यानच्या काळामध्ये राजेश सरांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या बरोबर आमची सभा आयोजित केली होती. या सभेचा उद्देश खरंतर आळंदी ते पंढरपूर दोन्ही मार्गांनी म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या दिंड्या बरोबर गेली चौदा वर्ष दरवर्षी 200 ते 250 विद्यार्थी जातात पण राजेश सरांचा दृष्टीकोनच एवढा मोठा की ते म्हणाले आपण 35 मुक्काम आहेत तर आपण 35 हजार विद्यार्थी स्वच्छता अभियानात आणूया झालं. आम्ही कामाला लागलो पस्तीस हजार विद्यार्थी एकत्र आणणं हे काम ये्रया गबाळ्याचे नक्कीच नाही मग यासाठी आपल्याला राजमान्यता लागेल. आपल्याला शासन मान्यता लागेल राज दरबाराकडून एखादी गोष्टीचा फतवा निघाला की काम होतात हा आमचा सगळ्यांचाच अनुभव होता. त्यांनी एक दिवस त्यांच्याच घरी एक सभा बोलावली

 आम्ही त्यांना या योजनेचे सादरीकरण केले आम्ही काय करणार 50 लाख पत्रावळ्याचं वाटप करायच कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर अर्थात आय कॉलेजनी तयार केलेलं कल्चर या पत्रावळ्या ज्या उष्टावळ्या होतात (उष्टावळ्या हा शब्द या निमित्ताने तयार झाला) त्यावर फवारायचे, त्याचे कंपोष्ट खत तयार करायच

       निर्मल वारी च्या लोकांना स्वयंसेवक म्हणून  मदत करणे म्हणजे शौचालयांमध्ये लोकांनी जावं शौचालयाचा वापर करावा यासाठी हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आरोग्य विद्यापीठाच्या मदतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे 1000 विद्यार्थी 35 ठिकाणी एकत्र जमणार आहेत आणि हे 35 ठिकाणी जमणारे 1000 म्हणजेच 35000 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशी एकत्र जमून त्या त्या ठिकाणी पालखी मार्गावरच्या त्या त्या गावाची स्वच्छता करणार आहेत. म्हणूनच या वारीचं नाव ठेवलेलं आहे स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, हरित वारी, निर्मल वारी, एन.एस.एस. वारी दादांना हे सांगितल्यानंतर दादा अत्यंत प्रसन्नपणे म्हणाले की आपण या संदर्भात मा. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊयात आम्ही अर्थातच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा सुद्धा दादांना सांगितलं. तिथे गंमत झाली. दादां आम्ही 15 हजार रोपांचे एकाच वेळी वितरण करणार असून तसा जागतिक विक्रम होणार आहे. दादा हसत म्हणाले, अरे पंधराच हजार मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला 35 हजार झाडे वाटतो मी म्हणालो दादा तुम्ही झाड वाटता पण विक्रम करत नाही पुढच्या वर्षी तुम्ही आमचा विक्रम मोडा. अर्थातच हशा पिकला आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या आशेने तिथून निघालो पुढच्या काही दिवसातच प्रसेनजीत फडणवीस यांचा मला एक दिवस फोन आला की सर आपल्याला मंत्रालयामध्ये बैठकीला जायचं व आणि आम्ही तयारीला लागलो कारण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर इतर अनेक मा. मंत्री अशा सगळ्यांसमोर राष्ट्रीय सेवा योजनेच्या इतिहासातील पन्नास वर्षात पहिल्यांदाच मंत्रालयामध्ये अशी बैठक होणार होती एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या विद्यापीठाचं आयोजन होणं




आणि त्याला अशी राजमान्यता मिळणं हे मात्र गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदा घडत होतं. आम्ही अतिशय पोटतिडकीने हे सगळं मांडलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की शासनाने हे सगळं अत्यंत आपलाच कार्यक्रम असल्यासारखं उचलून धरलं आणि धडाधड शासकीय आदेश निघाले मा. मुख्यमंत्र्यांनी 23 तारखेला या कार्यक्रमाचे आयोजन करणे विषयीचर मान्यता दिली. आणि मग आम्ही सगळेच 23 जून च्या तयारीला लागलो म्हणता म्हणता एक एक दिवस जवळ येत होता आम्ही उलट्या क्रमाने सगळी गणती करत होतो. क्रीडांगणावरची सगळी तयारी पूर्ण झालेली होती.

हळूहळू आम्ही पूर्णत्वाकडे येत होतो. मध्येच एक जण कोणीतरी मला वाटतं पांडे सर म्हणाले की नक्की 15 हजार विद्यार्थी येतील ना? कारण स्वामी भिसे या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांने असे सांगितले की, सर सात हजार संख्या फक्त नोंदली गेली आहे. सात हजारावर टप्पा पंधरा हजारा पर्यंत न्यायचा हे मोठे जिकरीचे काम होते. मग काय लागले सर्व कामाला. दोन दिवसात डॉ. देसाईनी बैठक ठरवली आणि ती ठरली भीमाशंकरला कारण विद्यापीठात बैठक घेतल्यानंतर दोन दिवसात कार्यशाळेमध्ये नक्की काय करायचं? कारण एकच काम नव्हतं केवळ गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डसाठी मुलं आनणं एवढेच काम नव्हतं तर या 35 मुक्कामाच्या ठिकाणी वारी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता करणारे, आरोग्य शिबिरे घेणे, पत्रावळ्या वाटणी करणं,


उष्टावळ्या गोळा करणं, त्याचं कंपोस्ट तयार करणे, खत तयार करणे आणि यापासून पुन्हा कल्चर मारणं अशी सगळी प्रचंड काम यामध्ये होती. आणि म्हणूनच हे शिबिर भिमाशंकरला एका अज्ञात स्थळी विजन वासात घेण्याचे ठरवले. साधारण 350 कार्यक्रमाधिकारी आले होते. ते बघूनच खरे तर आमचा उत्साह अतिशय वाढला.

        ज्या ज्या मुक्कामाच्या ठिकाणी एक हजार विद्यार्थी येणार आहेत अशा आयोजक महाविद्यालयांना आम्ही एकत्र केलं आणि एकत्र करून साधारण दहा ते बारा काही ठिकाणी वीस-बावीस महाविद्यालये एकत्र आली एकत्र येउन त्यांनी तिथे काय काय करणार तर समिती गठित कशी करणार इथपासून तर या सर्व कार्यक्रमाचे आयोजन कसे करणार ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी किती विद्यार्थी आणणार अशा सगळ्या


आयोजनाचा भाग होता सहकारी पद्धतीने शिक्षण यामधून जसं माहिती गोळा केली जाते तशा पद्धतीचं प्रशिक्षण त्यांना दिलं गेलं आणि त्यांनी एकत्र बसून हे सगळं ठरवलं या सगळ्यात प्रत्येकाने पोस्टर प्रेझेंटेशन केलं हा सगळा भाग दोन दिवसात संपला आणि मग विश्वास वाढला की होय आपण विद्यार्थी जमवू शकतो. पण दोन दिवसांनी असे लक्षात आले की ही संख्या तरीही 10 ते 11 हजाराच्यावर वर जात नाहीये आणि म्हणूनच आम्ही असे ठरवले की नाही आपल्याला संख्या वाढवावी लागेल आणि मग पुन्हा असे ठरले की आपण आयोजक महाविद्यालयांना बैठका घ्यायला सांगायच्या या बैठकांना व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किंवा अधिसभेच्या सदस्यांनी कोणीतरी हजर राहायचं आणि माहिती घ्यायची म्हणता म्हणता हा आकडा बऱ्यापैकी पुढील पंधरा हजाराच्या पुढे हा नक्कीच गेला टी-शर्टची तोपर्यंत ऑर्डर ही पंधरा हजार दिली होती ही आम्हाला वाढवावी लागली हे सगळे शेवटच्या दोन दिवसात घडत होतं ही संख्या वाढवली भोजन वाटप करण्यासाठी कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी अतिशय मोलाची कामगिरी पार पाडली त्यांच्याबरोबर असलेले तीस विभागातले विभाग प्रमुख  त्यांचे समन्वयक आणि प्रशासनामधील अधिकारी या सगळ्यांनी बिस्किट वाटप गोळ्या वाटप पाण्याचे वाटप टी-शर्ट वाटप आणि अर्थातच पुन्हा भोजन पॅकेट्स देणे अशी सगळी जबाबदारी स्वतः घेतली


23 तारीख एकदाची उजडली अगदी भल्या पहाटे पाच वाजेपासून लगबग सुरू झाली साडेपाचच्या सुमारास एक एक व्यक्ती व्यक्ती ज्यांना जी कामे दिली आहेत ती यायला सुरुवात पहिली अनाउन्समेंट  झाली  ती कॅमेरे चेक करण्याची दुसरी झाली वकील व अर्थातच निरीक्षक या सगळ्यांनी आपापल्या जागी तयार राहायचं कारण प्रत्यक्ष आठ वाजता  मा  कुलगुरू जे या गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड अर्जदार आहेत त्यांनी हे जाहीर करायचं होतं की, आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि साधारण साडेआठ ला या सगळ्याला सुरुवात झाली तोपर्यंत जो मंडप टाकला होता जी कणात लावली होती  कनातीमध्ये एकही माणूस नसलेला अर्थात निर्मनुष्य असलेला एक छायाचित्र  ड्रोन च्या साह्याने घ्यायचं होतं ते घेण्यात आलं मा. कुलगुरूंना पाचारण करण्यात आलं आणि त्याची सुरुवात झाली म्हणता म्हणता विद्यार्थी अर्थात राष्ट्रीय सेवा योजनेच स्वयंसेवक आत यायला सुरवात झाली. सर्व विद्यापीठामधून पुणे जिल्हयातील ३००पेक्षा जास्त महाविद्यालयातील विद्यार्थी येणार होते. सर्व विद्यार्थ्याना चार रंगाचे टी शर्ट तीन रंगाचा तिरंगा तयार करण्याचा मानस आधीच ठरला होता. त्याप्रमाणे नारंगी रंग, पांढरा व हिरवा आणि निळ्या रंगाचे टी-शर्ट घालून स्वयंसेवक यायला 8:30 वाजता सुरुवात झाली. वकील, स्टुअर्ट, निरीक्षक, छायाचित्रकार, अर्जदार, सल्लागार जागच्या जागी उभे होते. मा. कुलगुरूंनी पहिल्या विद्यार्थ्यास आत येण्यास टाईम कीपरच्या मदतीने सुरुवात करण्यास सांगितले. पहिलाच स्वयंसेवक केशरी रंगाचा टीशर्ट घालून क्रमांक एकच्या दरवाजातून आत आला.




आणि टाळ्यांच्या गजरात त्याचे जंगी स्वागत झाले. मिनिटाला 100 अशा वेगाने क्रीडांगणावरच्या ग्रीड भरत होत्या. सर्व गेट्स वर बऱ्यापैकी गर्दी होऊ लागली होती. वातावरण मध्येच ढगाळ तर थोड्याच वेळात निरभ्र होतं. वातावरण सातत्याने बदलत असल्याने मनात सारखं धस्स होत होतं. कारण आदल्या दिवशी पुण्यामध्ये जोरदार सरी आल्या होत्या त्यामुळे कार्यक्रमात पावसाचा राडा तर होणार नाही ना? याची भीती वाटत होती. पण सर्वांच्या सुदैवाने असे काही घडले नाही. कार्य निर्विघ्नपणे पार पडले. दीड तासात 9371 चा आकडा पार पडला आणि एकच जल्लोष झाला. कारण आम्ही गिनीज च्या विक्रमाची बरोबरी केली होती. विद्यापीठात चारी बाजूंनी हिरवे-निळे, भगवे-पांढरे टी-शर्ट घालून विद्यार्थ्यांचे थवे मुख्य क्रीडांगनाकडे कडे येत होते. एकूण 2 तास 15 मिनिटात 16731 चा आकडा पार पडला. टी-शर्ट सर्व संपले होते. अजूनही विद्यार्थी बाहेर तरंगत होते पण नाईलाज होता.
      11.15 वाजता मा. मुख्यमंत्री येणार होते. त्यामुळे थांबवण्या शिवाय पर्याय नव्हता. आणि हाच आकडा विक्रम म्हणून गृहीत धरायचे ठरले मा. कुलगुरूंनी त्यांचे आभाराचे भाषण केले. 'भारत माता की जय' चा एकच जल्लोष झाला.
        आता उरली ती गोळा बेरीज होणं गरजेचं होतं. विद्यार्थी किती आत आले. प्रत्येकाला झाड मिळाले का? सर्वांना झाड डोक्याच्या वर करून ड्रोन ने फोटो घ्यायला सांगितले. प्रत्येक मुलाला हातात बँड दिला होता तो स्कॅन केला होता. ड्रोन कॅमेऱ्यातून स्वयंसेवक आत येत होते.


    या सर्व दिव्यातून बाहेर आलो होतो. आता उत्सुकता आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून विक्रमाची नोंद झाली असे त्यांनी कळवायची.
          या सर्व कामे संस्थाचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व कार्यक्रम अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी व सर्वात महत्त्वाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांचे महत्त्वाचे योगदान लाभले. त्यांचे ऋण व्यक्त करावे तेवढे थोडेच आहे.
        भविष्याची वाट पाहूया भारताचा गिनीज मधला क्रमांक वर नेऊया
शुभेच्छा

*संजय चाकणे*
*ज्ञानसुत*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट